पुणे : दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुणाने (Pune Crime News) या तरुणीवर हल्ला केला. पुण्यातील (Pune Crime News) सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mira Road Murder Case: ‘त्या’ एका मेसेजमुळे झाली हत्या? सरस्वतीच्या WhatsApp चॅटमधून मोठा खुलासा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी तरुण हा गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता. अनेकदा त्याला समजावून देखील सांगण्यात आले होते. त्याच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची कल्पना देण्यात आली होती. मात्र एवढं होऊन देखील आरोपीने (Pune Crime News) मुलीला फोन करून धमकी दिली.धमकी देण्यात आल्यानंतर पुन्हा मुलीच्या आईने या मुलाला समजावून सांगितलं. तिला तुझ्यासोबत फ्रेन्डशिप करण्याची इच्छा नाही तु जर तिला पुन्हा त्रास दिला तर मी पोलीसात तक्रार करेल असं मुलीच्या आईने आरोपीला बजावले.
संपादकीय ! दर्शनाचा बळी…म्हणे राहुल हंडोरेचे प्रेम होते…छे..! प्रेम कधी बळी घेतं का?
Pune Crime News : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर pic.twitter.com/xa59vR6CaT
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 27, 2023
या गोष्टीचा राग आल्याने आरोपीनं मुलीला रस्त्यात एकटं पाहून तिच्यावर कोयत्यानं वार केला. या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली आहे. मात्र तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्यामुळे पुण्यात (Pune Crime News) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पीडित मुलीची प्रतिक्रिया
आज सकाळी झालेल्या हल्ल्या संदर्भात पीडित मुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी तरुण हा पीडित तरुणीचा मित्र होता. मी त्याला नाही म्हंटले म्हणून आरोपीने तरुणीला धमकी दिली तसेच कॉलेजवर येऊन तिला मारहाणदेखील करायचा. तसेच तो माझा सतत पाठलागदेखील करायचा. या प्रकरणाची माहिती आरोपीच्या तरुणाच्या घरच्यांना दिली. तरीदेखील त्याने हे सगळे सुरूच ठेवले. घरच्यांना या गोष्टीची माहिती दिल्यामुळे आरोपीने आज सकाळी पीडित तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात माझ्या हाताला पायाला लागले असून टाके पडले आहेत. आज सकाळी पीडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपीने तिला गाठले त्याने तिच्याशी ५ मिनिटे बोलायचे आहे असे सांगून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने थांबण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केला. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडित मुलीच्या आईची प्रतिक्रिया
आरोपी तरुण हा बरेच दिवस पीडित तरुणीला त्रास देत होता. याबद्दल पीडित तरुणीच्या आईने याबद्दल आरोपी तरुणाला तिला यापुढे त्रास देऊ नको अशी समाज दिली. तसेच आरोपी तरुणाच्या घरच्यांनादेखील याची कल्पना दिली. मात्र तरीदेखील हा तरुण तिला त्रास देताच राहिला. यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल करेन अशी वॉर्निंग दिली. याचा या तरुणाला राग आल्याने त्याने आज सकाळी पीडित तरुणीवर हल्ला केला. अश्या या मनोरुग्ण तरुणाला कॉलेजमध्ये प्रवेशसुद्धा दिला नाही पाहिजे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पीडित मुलीच्या मित्राने तिचा जीव वाचवल्यामुळे माझी मुलगी आज सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे.