PUNE NEWS: पुण्यात मित्रावर विश्वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय!… मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याने हडपसर भागात एकच
खळबळ उडाली.. मात्र मात्र अवघ्या दोन तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या.. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे..
Pune News : कोथरुड पोलिसांच्या चौकशीत तरुणींना जातीवाचक शिवीगाळ? सुप्रिया सुळे आक्रमक
किसन राजमंगल सहा याने शनिवारी दोन जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला , उंद्री हांडेवाडी येथील साईगंगा सोसायटीच्या समोरील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये माझा मित्र रविकुमार शिवशंकर यादव याला 3 ते 4 जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अशी माहिती त्याने पोलिस कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर पोलिसांची टीम काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली आणि रविकुमार शिवशंकर यादव याला जवळील रुग्णालयात दाखलं केलं , डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं..
त्यानंतर पोलिसांनी किसन सहा याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली त्याने सांगितलं की दुचाकीवरून आलेल्या 3 ते 4 जणांनी रविकुमार शिवशंकर यादव याच्याकडे गादी आणि बेड शीट मागितली. त्या वस्तू देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्या तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने त्याला मारहाण केल्याचे सांगितले.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. मात्र त्यामध्ये पोलिसांना अशा प्रकारची घटना दिसून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देणारा किसन राजमंगल सहा याच्याकडे अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागल्यावर, त्याला पोलीस खाक्या दाखवताच किसन राजमंगल सहा यांनी खून केल्याची कबुली दिली. मी आणि रविकुमार दारू पीत बसलो होतो. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये वाद झाला. तो राग मनात धरून रविकुमार शिवशंकर यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची कबुली आरोपीने दिली.
“कधी कधी खरा धोका बाहेरून नाही, तर आपल्या अगदी जवळच असतो… आणि उंड्रीत घडलेली ही घटना याचं जिवंत उदाहरण आहे.”जेवणाच्या ताटात जेवतं असलेलं नातं, एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कसं बदलू शकतं… हे बघताना अंगावर काटा येतो.”किसन सहा आणि रविकुमार यादव — दोन मित्र, एकत्र दारू प्यायले, गप्पा मारल्या… आणि क्षुल्लक वादातून एका मित्राने दुसऱ्याचा जीव घेतला!””त्याहून धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर तोच मित्र पोलिसांना कॉल करून इतर तीन ते चार तरुणांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगतो… अवघ्या दोन तासातच पोलीस कसून तपास करून या खुनाचा छडा लावतात.. आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे त्याचा चौकशीतून अजून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणार आता महत्त्वाचा असणार आहे.