पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह (Pune Crime) सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटवणे अवघड जात आहे. पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दर्शना दत्तू पवार (Darshana Dattu Pawar) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची (MPSC) परीक्षा परीक्षा पास झाली होती. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. 15 जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये ही तरुणी हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह आढळून आला.
पाण्याच्या टाकीत बुडून बाळाचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना
या घटनेची (Pune Crime) माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली. संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आता या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच तिच्या कुटुंबियांनादेखील मोठा धक्का बसला आहे.