पुणे : पुणे पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली आहे.
छापेमारीला कशी झाली सुरुवात?
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोमवारी वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले आणि हिकडूनच या छापेमारीला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सुत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज जप्त केला. त्यानंतर दौंडमधील कुरकुंब एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारला. त्या ठिकाणी ड्रग्जची निर्मिती होत होती. या ठिकाणी पोलिसांनी 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. यादरम्यान ड्रग्स तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले.
काय आहे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
19 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले. या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक एमडी मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत कुठे आणि किती किती ड्रग्ज पकडले ?
दिल्लीत पहिल्या कारवाईत 600 किलो एमडी जप्त
दिल्लीतील दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
पुणे पोलिसांकडून ३ दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एम डी ड्रग्स जप्त
गेल्या 3 दिवसात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई
फेब्रुवारी 18 : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये 2 किलो एमडी जप्त
फेब्रुवारी 19 : विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एमडी जप्त
फेब्रुवारी 20: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
फेब्रुवारी 20 : पुणे पोलिसांनी राजधानी दिल्लीत कारवाई करून 800 कोटी रुपयांचे 400 किलो एम डी केले जप्त
फेब्रुवारी 21 : पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाई मध्ये दिल्लीत 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो एम डी हस्तगत
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी
Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन