पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंग (koyta gang) ची दहशत (Pune Crime) सुरूच आहे. पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही कोयता गॅंगचे गुन्हे वाढत आहेत. त्यातच आता किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
पुण्यातील स्वारगेट भागातील मुकूंदनगर परिसरात किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. यश अनिल कुंभार (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असं जखमी झालेल्या कोणाचं नाव आहे. तर या प्रकरणी अक्षय आबासाहेब सरोदे, भुत्या ऊर्फ रोहित बाबासाहेब काते (दोघ रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अखेर खातेवाटप झालं! गृहखातं भाजपकडेच; वाचा कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं?
या प्रकरणी जखमी तरुणाच्या आईने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यशचे काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय आणि रोहित यांच्याशी वाद झाले होता. त्याच रागातून या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. सोमवारी गुलटेकडी परिसरात असलेल्या कटारिया शाळेसमोर निखिल भिसोरे, कैलास बनसोडे या मित्रांसह यश बसलेला होता. त्यावेळी अक्षय व रोहित तिथे आले. त्यांनी यश आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या किरकोळ वादा नंतर या दोघांनी थेट यशच्या पाठीवर कोयत्याने वार केले. जखमी यशला तिथेच सोडून आरोपी पसार झाले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील हे तपास करत आहेत.
TOP NEWS MARATHI : शिवसेनेकडेकडील ‘ते’ खातं राष्ट्रवादीला कसं मिळालं? INSIDE STORY