Pune Crime

Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक

826 0

पुणे : पुण्यात इंदापूरमध्ये हॉटेलमध्ये गोळ्या झाडून केलेल्या खून प्रकरणी (Pune Crime) पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत अविनाश धनवे याचा खून करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. अविनाश धनवे खून प्रकरणी त्यांची पत्नी पूजा धनवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
पूर्ववैमनस्यातून आळंदी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये अविनाश धनवे याच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. डोक्यात गोळ्या झाडल्याने अविनाशचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतरही त्याच्यावर कोयत्याने वार केले गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

धनवे याचे वर्चस्व वाढत असल्याने खुशाल तापकिर, विशाल तापकिर यांच्या सांगण्यावरून हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल चव्हाण, देवा सुतार, मयूर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश बनकर, मयूर पाटोळे यांनी अविनाशचा खून केला. अविनाशची पत्नी पूजा धनवे हिने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आरोपी प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे याने पतीला घरातून बोलावून नेले. तसंच पतीची माहिती या गुन्ह्यातील इतर आरोपींना दिली असल्याचा आरोपही पूजा धनवे यांनी केला आहे. या गुन्ह्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत 24 तासांत आरोपींना अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!