Pune News

Pune Crime : लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

676 0

पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या (Pune Crime) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती. याचे भूमिपूजन आज करण्यात येणार आले. या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान नागरिक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.

काय घडले नेमके?
एका पोलीस कर्मचाऱ्याने कार्यक्रमादरम्यान तुमचा समाज हा थर्ड क्लास आहे असे उदगार काढल्याने नागरिक आणि पोलीस यांच्यात ही बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. हे प्रकरण एवढे वाढले कि यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. या प्रकरणामुळे काही काळ कार्यक्रमाच्या स्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share This News
error: Content is protected !!