PUNE CHAKAN WOMEN CASE: पुण्याचा चाकणमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून
एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.
या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यवतमाळमध्ये भर रस्त्यात लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं
दिनांक 5 ते 7 जून दरम्यान हे धक्कादायक घटना घडली.
प्रकरणात सात जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापैकी एकावर बलात्काराचा आरोप आहे. मुख्य आरोपीने हे कृत्य जुन्या रागातून केल्याचा संशय पोलिसांना आहे.
महिलेने मुख्य आरोपीच्या विरोधात याआधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती,
त्यामुळे संतापलेल्या आरोपीने मित्रांच्या मदतीने तिचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेने याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश नानेकर,, बारकू गोसावी, सुभाष सुतार, प्रज्वल जाधव आणि यश शिंदे यांना अटक केली आहे.
तर ओम नानेकर आणि रणजित येरकर हे फरार आहेत.
मुख्य आरोपी गणेश नानेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध राज्यभरात १४ गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी पीडितेने नानेकरविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने नानेकरने तिला चाकूच्या धाकाने अपहरण केले आणि साथीदारांच्या मदतीने गोसावीच्या घरी नेले.
तिथे तिला खोलीत डांबून मुख्य आरोपीने चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत आहे. महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांना १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच महिलेने गणेश नानेकरविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, पुराव्याअभावी आणि अन्य कारणांमुळे ते प्रकरण बंद झाल्याची माहितीही समोर आली.
Sangli crime news: धक्कादायक! सांगलीत पैश्याच्या वादातून खून, दोघांना अटक