BEED NEWS: बीडमध्ये (BEED NEWS) गुन्हेगारांच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे.. घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवला.. असं विचारल्याने रागातून आरोपींनी एका शेतकऱ्याला टेकडीवर नेवून बेल्टने आणि बुक्क्यांनी मारहाण केली..

PUNE CALL CENTER SCAM: पुण्यात डिजिटल अटकेच्या नावाखाली लाखो डॉलरची लूट

2086 0

PUNE CALL CENTER SCAM: पुण्यामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता असतानाच पुण्यातील खराडी मुंडवा बायपास वरील एका इमारतीवर छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.PUNE CALL CENTER SCAM:

डिजिटल अटकेच्या नावाखाली लाखो डॉलरची लूट
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या मालिकांचे मालिकांचे सत्र सुरूच आहे..किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत रोडवर राडे, महिलांवरील अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता गँगच्या हल्ल्यांसारख्या हिंसक घटनांनी पुणे हादरून गेलं आहे..

आणि आता त्यातच पुण्यातील खराडी मुंडवा बायपास रस्त्यावरील प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे.

मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली फसवून करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं

त्यांच्याकडून तपासात मिळालेल्या माहितीनुसार अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.

आरोपी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकेच्या धमक्या देत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. या कॉल सेंटरमध्ये सुमारे 123 लोक काम करत होते.

त्यामध्ये 111 पुरुष तर बारा महिला या कॉल सेंटर चालवत होत्या. त्यामध्ये 8 जण प्रमुख होते. या बनावट कॉल सेंटरमधून दररोज 1 लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवण्यात येत होता.

या बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यात येत होते. क्रिप्टो करेंसीच्या माध्यमातून पैसे घेतले जात होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. या छाप्यात 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप आणि महत्त्वाचा डिजिटल डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे.

WHO IS KARISHMA HAGWANE: वय 34,लक्ष्मीतारा कंपनीची मालकीण; वैष्णवी हगवणेला त्रास देणारी ‘पिंकी ताई’ कोण?
पुण्यात एकापाठोपाठ एक गुन्हेगारींच्या मालिकांचा सत्र सुरू असतानाच खराडी मुंडवा बायपास रस्त्यावरील एका इमारतीत बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. पुणे गुन्हे शाखेच्या 150 ते 200 पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

डिजिटल अटकेची धमकी देऊन हे कॉल सेंटर मधील आरोपी अमेरिकेतील लोकांकडून पैसे उकळत होते.

या प्रकरणात पोलिसांनी 41 मोबाईल फोन 61 लॅपटॉप आणि महत्त्वाचा डेटा जप्त केला.

NANA PATOLE: झुडपी जंगलाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील अनेक कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका!

भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणारी YOUTUBER JYOTI MALHOTRA कोण आहे?

Share This News
error: Content is protected !!