पुण्यातील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या; नेमकं प्रकरण काय?

668 0

पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहारमध्ये अपहरण करुन त्यांची हत्या कऱण्यात आली. व्यवसायानिमित्त ते बिहार राज्यात गेले असता तिथेच गुंडांनी त्यांचा खून केला.

लक्ष्मण साधू शिंदे ( वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ते रत्नदीप कास्टिंगचे संस्थापक म्हणून कार्यरत होते.

तब्बल १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते बिहारला गेल्यापासून ते बेपत्ता झाले होते. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खूनाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!