Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

484 0

पुणे : पुण्यातील चाकणमधील (Pune Crime News) खराबवाडी या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाला शॉक लागल्याने त्याला वाचवायला गेलेल्या आईलादेखील शॉक लागला आणि या दुर्घटनेत दोघा मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काय घडले नेमके?
चाकणमधील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाचा मृत्यू झाला आहे. पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय15) असे मृत मुलाचे नाव आहे. घराच्या छतावर आईसोबत 15 वर्षीय मुलगा छतावर आला होता.

यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई त्याला वाचण्यासाठी गेली मात्र तिलादेखील शॉक लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!