Pune drug bust: कोल्हापूर कृती दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने, पुणे शहराच्या हडपसर भागात मोठी कारवाई करत मेफेड्रोन (MD) या सिंथेटिक ड्रग्जची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका (Pune drug bust) तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ आणि इतर साहित्याची एकूण किंमत ₹४४,३१,९५० इतकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पथकाचे अधिकारी हडपसर, वानवडी आणि काळेपडळ परिसरात गस्त घालत असताना, त्यांना मांजरी ते चौक क्र. १५ रोडवरील इंडेन गॅस एजन्सीजवळ एका दुचाकीवर एक महिला आणि एक तृतीयपंथीय व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळले.
RAVINDRA DHANGEKAR : जैन बोर्डिंग प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी चतुर्श्रुंगी पोलिसांना दिला अर्ज
अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडून ६० ग्रॅम मेफेड्रोन (MD) आणि ८ मिलीलीटर मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, दोन मोबाईल फोन, एक वजनकाटा आणि ड्रग्ज वाहतुकीसाठी (Pune drug bust) वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि इतर सामानाची एकूण किंमत ₹३१,९५० आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मेघा दीपक जगताप (वय २७, रा. महादेव नगर, हडपसर) आणि स्नेहल उर्फ गणेश शिवसंच (वय २१, रा. सासवणेनगर रोड, हडपसर) या तृतीयपंथीय व्यक्तीचा (Pune drug bust) समावेश आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, मेघाने हा अंमली पदार्थ घोळपडे पेठ येथील रहिवासी असलेल्या सलमान सलीम शेख याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सलमान सलीम शेख यालाही अटक केली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई उपअधीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर कृती दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी केली. या पथकात सरोजिनी चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक माधवानंद ढोत्रे आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.