PUNE NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार

व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा विद्यार्थिनीचा आरोप अन् मुख्याध्यापकाची आत्महत्या

946 0

मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांनंतर शाळेतील शिक्षकांवर असते. परंतु यांचं शिक्षकी पेशाला काळीमा असणारी घटना नांदेडमध्ये घडली.

नांदेडमधील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर, या मुख्याध्यापकाने विष प्राशन केले. पाहुयात हे सगळं प्रकरणं नेमकं काय आहे.

नांदेडमध्ये पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळा आहे. या शाळेवर मुख्याध्यापकपदी 55 वर्षीय सुनील कारामुंगे हे कार्यरत होते. सुनील कारामुंगे यांनी 25 मार्च 2025 रोजी घरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल करतं मुंबईला अश्लील चाळे केले. ही बाब पीडित मुलींने तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांना मारहाण केली. त्यानंतर पीडित मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून आणि पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग, जिवे मारण्याची धमकी, बाल लैंगिक अत्याचार अर्थात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मारहाण झाल्यानंतर आणि पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजामध्ये आपली बदनामी होईल या भीतीने मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
12 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांचा मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली. एका मुख्याध्यापकांनं एका विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केलं. त्यानंतर या मुख्याध्यापकावर नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याने आपली समाजात बदनामी होईल. या भीतीने मुख्याध्यापक सुनील कारामुंगे आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली. यामध्ये संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी माझा मानसिक छळ केला त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितल्या जातं आहे. या सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून या व्हिडिओ कॉल मध्ये नेमकं काय संभाषण झाले हे अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु या मुलींच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याचा आरोप मयत सुनील कारामुंगे यांनी सुसाईड नोटमध्ये केल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!