PALGHAR POLICE: वर्दीतले रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली.
चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर हवालदारानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे.
PALGHAR CASE:पोलिस कर्मचाऱ्याचं दुष्कृत्य, चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर अतिप्रसंग
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाचं ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते
त्याचं पोलिस दलातील कर्मचारी शरद बोगाडे याने एका महिलेला चौकशीसाठी बोलावून घेतलं
आणि त्यानंतर एका रूममध्ये नेवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला.
PALGHAR POLICE: चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार; पाहा संपूर्ण प्रकरण नेमकं काय?
त्यानंतर गुन्ह्याचा तपास पुढील कारवाईसाठी कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
हवालदार बोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी
तातडीची कारवाई करत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची बदली करून
त्यांना जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आलं. त्यांच्या जागी अमर पाटील यांनी कासा पोलीस ठाण्याचे
नवे पोलीस निरीक्षक म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला
.या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा
प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे