Police News

Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर…; हेड कॉन्स्टेबलच्या ‘त्या’ पत्राने पोलीस दलात उडाली खळबळ

690 0

अहमदनगर : अहमदनगर पोलीस दलातून (Police News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलने वरिष्ठांना लिहिलेल्या एका पत्राने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. रामनाथ भाबड असे पत्र लिहिणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. हे नेमके प्रकरण काय आहे जाणून घेऊया…

रामनाथ भाबड हे पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन त्यांनी पोलीस अधिक्षकांना दिले आहे. दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेल असे त्याने आपल्या पत्रात म्हंटले आहे. त्याने हे पत्र पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पाठवलं आहे. या पत्रामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय लिहिले आहे पत्रात ?
पदोन्नती करताना पक्षपातीपणा, भ्रष्टाचार झाला आहे. पदोन्नती मार्कांनुसार आणि सेवाज्येष्ठतेनुसार झाल्याचं दिसून येत नाही. यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार केल्यासारखं दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत मार्कानुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न काढल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. याची जबाबदारी अहमदनरच्या पोलीस अधीक्षकांची राहिल असे रामनाथ भाबड यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : आणखी एक बळी ! मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Loksabha Security Breach : संसद भवनाच्या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!