Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

452 0

पिंपरी : पिंपरीमधून (Pimpari News) एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. यामध्ये चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार मालाची गोदामे आहेत. मध्यरात्री 1 वाजून 38 मिनिटांनी या गोदामांना आग लागली.

या आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या सर्व उपकेंद्रातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पुणे,पीएमआरडीए, एमआयडीसीचेही बंब मागविण्यात आले होते. खासगी कंपन्यातील अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात आली होती. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून त्या ठिकाणी कुलिंगचे काम सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News
error: Content is protected !!