फोन बंद, घर बंद… IAS पूजा खेडकर यांचं कुटुंब फरार ? पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू

571 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय फरार झालेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून खेडकर कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊन शकलेला नाही, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. खेडकर कुटुंबीयांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. खेडकर कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवायचे आहे मात्र कुटुंबातील कोणाशीच पोलिसांचा संपर्क होत नाहीये. विविध प्रकरणांची चौकशी आणि तपास करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांना पोलीस संपर्क करत आहेत. मात्र खेडकर कुटुंब सध्या नेमके कुठे आहे याची माहिती मिळत नाहीये.

दरम्यान दोन दिवसांपासून या सर्वांचे मोबाईल देखील स्विच ऑफ लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने खेडकर यांच्या घरी जाऊन बंगल्याचा चित्रीकरण देखील केले. काल देखील पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते, मात्र कालही कुटुंबातील कोणीही घरात नव्हते त्याचबरोबर बंगल्या बाहेरचे गेट ही बंद असल्यामुळे आत जाऊन तपास करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. त्यामुळेच खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून तीन पथकेही तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते.‌

Share This News
error: Content is protected !!