PCMC FIRING NEWS PUJARI GANG: पिंपरी चिंचवडच्या व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गॅंगचा शूटर

124 0

PCMC FIRING NEWS PUJARI GANG: सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार करणाऱ्या पिंपरीतील व्यवसायिकावर गोळीबार करणाऱ्या

आरोपीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय.

विशेष म्हणजे हा आरोपी पुजारी गॅंगचा शूटर असल्याचे माहितीही समोर आली आहेत.

रवींद्र घारे असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि

11 जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.

:पंढरपूरला निघालेल्या तरूणीवर दौंड जवळ अतिप्रसंग; 24 तास होऊनही आरोपी मोकाट
काही दिवसांपूर्वी रवींद्र घारे याने पिंपरीतील एका व्यावसायिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

या व्यवसायिकाने प्रतिकार केल्याने भर दिवसा बाजारातच आरोपीने व्यावसायिकावर गोळीबार केला.

ही गोळी व्यावसायिकाच्या पायाला लागली. या घटनेने शहरभरात खळबळ उडाली.

कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले.

त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला.

गोळीबार करताना रवींद्र घारे यांनी हेल्मेट आणि रेनकोट घातला असल्यानं त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी आल्या.

POLICE BHARATI 2025 : मोठी बातमी! राज्यात तब्बल 15,000 पोलीस पदांची ‘मेगाभरती’

सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल व 11 जिवंत काडतुसंही जप्त केली.

हाच रवींद्र घारे कुख्यात पुजारी गॅंगचा शूटर आहे. त्याच्यावर 25 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?

यामध्ये एक हत्येचा गुन्हा असून गोळीबाराचे सहा गुन्हे आहेत.

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा

सध्या तो नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायकावरील गोळीबारप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत फरार होता.

मात्र अनेक दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत होता.

त्यामुळेच तात्काळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

DHANANJAY MUNDE SATPUDA: धनंजय मुंडेंचा मुंबईत फ्लॅट सोडवेना ‘सातपुड्या’चा थाट !

तिथेच त्याने गोळीबार केला आणि अखेर कसून तपासाच्या अंती मालमत्ता विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या.

YAVATMAL ZP SCHOOL NEWS: यवतमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग

Share This News
error: Content is protected !!