Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात आला आहे. कारण त्यांच्या अमेडिया या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाचा म्हणजेच ‘जिजाई’ (Parth Pawar Land Scam) बंगला असल्याचं समोर आलं आहे. मात्र हा बंगला निवासी स्वरूपाचा असताना, तिथे कंपनीचे कार्यालय कसे चालू ठेवण्यात आले? आणि जर तसं असेल तर मिळकत कर व्यावसायिक दराने भरला आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या वादाची पार्श्वभूमी थेट मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाशी जोडली जात आहे.
Pune Jamin Ghotala: पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; कृषी विभागाच्या 5 एकर जमिनीचा घोटाळा
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमार्फत करण्यात आली.या जमिनीची बाजार किंमत सुमारे 1,800 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.मात्र, या (Parth Pawar Land Scam) जमिनीची खरेदी केवळ सुमारे 300 कोटी रुपये इतक्यात करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या व्यवहारात शासनाची तब्बल 152 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप नोंदवला गेला आहे.सर्वात महत्वाचं म्हणजे, या व्यवहारात फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचं दस्तऐवजांमधून स्पष्ट झालं आहे.या प्रकरणात सहदुय्यम निबंधक रविंद्र तारू यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर PUNE CITY AMITESH KUMAR यांचा माध्यमांशी संवाद
दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.मात्र, कंपनीत 99% भागभांडवल असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही, हे देखील चर्चेचा मुद्दा ठरलं आहे. (Parth Pawar Land Scam) दरम्यान, अमेडिया कंपनीचा पत्ता ‘जिजाई’ बंगल्याचा असल्यामुळे, आता प्रश्न उपस्थित केला जातोय की निवासी बंगल्यात व्यावसायिक कार्यालय चालवले गेले का?जर होय, तर पुणे महापालिकेला कर व्यावसायिक श्रेणीतून भरला गेला का? विशेष म्हणजे, अविनाश भोसले यांच्या मालकीचा हा बंगला असून अजित पवार इथे भाडेतत्त्वावर राहतात.आणि याच पत्त्याचा उल्लेख आदर्श प्रकरणातही झाला होता.म्हणूनच ‘जिजाई’ बंगला पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलाय.