PARBHANI NEWS: चालत्या बसमध्ये जन्म दिलेल्या पोटच्या गोळ्याला खिडकीतून फेकून देऊन आई- वडील पसार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पुण्याहून परभणीला (PARBHANI NEWS) जाताना लागणाऱ्या पाथरी गावाजवळ घडली.

PARBHANI NEWS:धावत्या बसमध्ये प्रसूती अन् खिडकीतून फेकून दिलं बाळ; नराधम आई- बापाचं अमानुष कृत्य

126 0

PARBHANI NEWS: चालत्या बसमध्ये जन्म दिलेल्या पोटच्या गोळ्याला खिडकीतून

फेकून देऊन आई- वडील पसार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पुण्याहून परभणीला (PARBHANI NEWS) जाताना लागणाऱ्या पाथरी गावाजवळ घडली.

या नराधम जोडप्यानं टोकाचं पाऊल का उचललं पाहूया

Parbhani Farmers| प्रलंबित मागण्यांसाठी परभणीच्या शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
रितिका ढेरे असं या 19 वर्षीय तरुणीचं तर अल्ताफ शेख असं 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

हे दोघेही परभणीचे असून ते पती पत्नी असल्याचा दावा त्यांनी केलाय.

हे दोघेही पुण्याहून परभणीला जाण्यासाठी खाजगी बसनं निघाले होते.

ही बस वाटत असतानाच तरुणीला प्रसूती वेदना व्हायला लागल्या.

Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह

तिने बस मध्येच मुलाला जन्म दिला. मात्र बस पाथरी गावाजवळील देवनांद्रा शिवाराच्या परिसरात आल्यानंतर या दोघांनीही बाळाला बसच्या खिडकीतून फेकून दिलं.

ही घटना पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. खिडकीतून कुणीतरी काहीतरी फेकल्याचं चालकाच्या लक्षात आलं.

त्यामुळे त्याने बस थांबवली. त्याचवेळी सहप्रवासी महिलेने हा सर्व प्रकार इतर प्रवाशांना सांगितला. तात्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यावेळी या दोघांनी आपण पती-पत्नी असल्याचं सांगितलं. या अमानुष कृत्यासाठी या दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?
बसमधून फेकलेलं हे अर्भक मृतावस्थेत आढळून आलं. त्याचा जन्मताच मृत्यू झाला

की फेकल्यानंतर मृत्यू झाला याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल.

त्याचबरोबर हे दोघे खरंच पती-पत्नी आहेत का आणि जर असतील तर त्यांनी स्वतःच्या पोट समोर फेकून का दिलं

याचाही तपास सुरू आहे. दरम्यान ही घटना समोर येताच राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?

 

Share This News
error: Content is protected !!