Parbhani News

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

332 0

परभणी : परभणीतील (Parbhani News) जिंतुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळं चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फरीया शेख असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

जिंतूर शहरातील मिश्किन प्लॉट परिसरात 3 वर्षीय फरीया शेख ही चिमुकली खेळत असताना तिचा स्पर्श त्या ठिकाणी असलेल्या एका विजेच्या खांबाला झाला. या खांबात वीज प्रवाह उतरला होता. त्यामुळं तिला विजेचा धक्का लागला. वीजेचा धक्का लागल्याने चिमुकली तडफडत खाली कोसळली.

यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!