पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली असून, स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार त्याच्यावर दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
चिंचवड गावातील पूजा वाईन्स या ठिकाणी काही वेळापूर्वी ही धक्कादायक घटना घडली. या धक्कादायक घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाली वाईन शॉप मध्ये बिल घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप चालका मध्ये वादावादी झाली. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने सुरुवातीला वाईन शॉप चालकावर तसेच वाईन शॉप मधील कामगारांवर लाथाबुक्याने मारहाण करून दगडाने हल्ला केला. त्यानंतर एका गावगुंडाने त्या ठिकाणी येऊन कोयत्याने वाईन शॉप चालक आणि वाईन शॉप च्या कामगारांवर हल्ला केला आहे. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गावगुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चिंचवड पोलीस करत आहेत.