Palghar News

Palghar News : पालघर हादरलं ! दोन भावांची माथेफिरूकडून निर्घृणपणे हत्या

768 0

पालघर : पालघरमधून (Palghar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बोईसरच्या कुडन भागात धारदार शस्त्राने वार करुन दोन भावांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार माथेफिरूने धारदार शस्त्राने वार करून दोन भावांची निर्घृणपणे हत्या केली.भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी या दोन्ही वृद्ध मृतांची नाव आहेत. दोन्ही भाऊ बेसावध असताना या माथेफिरूने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर मारेकऱ्याने जंगलात पळ काढला. मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या मारेकऱ्याला एका नाल्याच्या चिखलातून शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याने ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तारापूर पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navneet Kaur Rana : नवनीत राणांचं ठरलं ! लोकसभा निवडणूक ‘या’ पक्षाच्या चिन्हावर लढवणार

Pandharpur Blast : पंढरपूरमध्ये भीषण स्फोट; 1 किमी पर्यंतचा परिसर हादरला

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!