PALGHAR NEWS: पालघर जिल्ह्यातील एक मोठी बातमी. पालघरमधील प्रसिद्ध उद्योजक विनोद अधिकारी यांच्या मनोर येथील ‘वर्ल्ड वाईन शॉप’च्या (PALGHAR NEWS) मॅनेजरला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. नियमबाह्य पद्धतीने गुजरात राज्यात दारूची विक्री केल्याप्रकरणी गुजरातच्या भावनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या मॅनेजरला घेऊन ते गुजरातकडे रवाना झाले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभाग अजूनही निष्क्रीय असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
PUNE TULSHIBAUG THEFT WOMEN ARRESTED: पुण्यात दिवाळीच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ
गुजरात पोलिसांकडून महिनाभराच्या कालावधीतील अवैध दारू विक्रीसंदर्भातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. पालघरच्या वर्ल्ड वाईन शॉपमधून नियमबाह्य पद्धतीने दारूचा (PALGHAR NEWS) साठा गुजरात राज्यात विकण्यात आल्याची नोंद भावनगर पोलिसांनी केली आहे.
PALGHAR WORLD WINE SHOP मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक; नियमबाह्य दारू विक्रीवर कारवाई
आरोपी मॅनेजरला ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलीस पालघरमधील मनोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तांत्रिक अडचणींमुळे आणि काही कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे गुजरात पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागली. मात्र, गुजरात पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या दबावामुळे अखेर वर्ल्ड वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याला मनोर पोलीस ठाण्यात आणले गेले. आवश्यक शासकीय सोपस्कार आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आले.
SACHIN KHARAT ON GOPICHAND: रिपाइं नेते सचिन खरातांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका
या कारवाईतून एक गंभीर बाब समोर येत आहे. अवैध पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी उद्योजक कारवाईपासून स्वतःचा बचाव करत आहेत आणि (PALGHAR NEWS) त्याची सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ढकलली जात आहे. यामुळे वाईन शॉपचे मालक आणि उद्योजक विनोद अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाची भूमिका. गुजरातमध्ये अवैध दारू विक्री होत असताना आणि गुजरात पोलीस येऊन कारवाई करत असतानाही पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभाग शांत आहे. या विभागावर आर्थिक देवाणघेवाणीमुळे आणि नियमबाह्य दारू विक्रीच्या प्रकरणात जाणूनबुजून निष्क्रीय राहण्याचा गंभीर आरोप केला जात आहे. जर गुजरात पोलिसांना कारवाई करावी लागत असेल, तर स्थानिक उत्पादन शुल्क विभाग नक्की काय करत होता, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.