Palghar Adivasi Ashram School Student Suicide: Death of Two Students Sparks Uproar; Suspicion Surrounds School Administration

Palghar Adivasi Ashram School Student Suicide: पालघरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; प्रशासनावर संशयाचं वातावरण

109 0

Palghar Adivasi Ashram School Student Suicide: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आदिवासी आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी (Palghar Adivasi Ashram School Student Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने पालघर जिल्हा हादरला असून, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ATS RAID IN KONDHWA PUNE: 2010 मध्ये ‘इंडियन मुजाहिदिन दहशतवादी संघटने’ची कंट्रोल रूम असणारी ‘अशोका म्यूज सोसायटी’ पुन्हा चर्चेत कोंढव्यात ATS कारवाई; मोठा घबाड हाती

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नावळे (१५, इयत्ता दहावी, रा. मोखाडा बीवळपाडा) आणि मनोज सिताराम वड अशी आहेत. मिळालेल्या (Palghar Adivasi Ashram School Student Suicide) प्राथमिक माहितीनुसार, या दोघांनी आश्रमशाळेच्या आवारात कपडे वाळत घालण्यासाठी असलेल्या दोरीने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आंबिस्ते येथील या दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Bhide Bridge Reopening Pune: भिडे पूल ११ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू; दिवाळीसाठी वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबीय (Palghar Adivasi Ashram School Student Suicide) आणि पोलिसांना माहिती देण्यापूर्वीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवले आणि वाडा ग्रामीण रुग्णालयात हलवले, असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यामुळे संशयाची परिस्थिती निर्माण झाली असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय पालक आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. जव्हारचे प्रकल्प अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा अहवाल आणि पोलीस तपासातूनच आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

RAVINDRA DHANGEKAR यांनी NIESH GHAIWALप्रकरणात CHANDRAKANT PATIL यांच्यावर आरोप DHEERAJ GHATE आक्रमक 

या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक पालक आणि आदिवासी समाजात प्रचंड संताप असून, त्यांनी शाळा प्रशासन आणि संबंधित आदिवासी विकास विभागांवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जात नाही, रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही आश्रमशाळांमधील सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. वाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आदिवासी नेते यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे सरकारला तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!