NILESH CHAWAN: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होता दिसत आहेत. या प्रकरणात वैष्णवी यांचे पती, सासू आणि ननंद त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते.. त्यानंतर पोलिसांनी मोठा शिताफीने दोघांना अटक केली.. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं मुल माहेरच्यांकडे सोपवण्यास नकार देतं वैष्णवीच्या घरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. आणि त्याचबरोबर आता या निलेश चव्हाण इतिहासही आता समोर आला.

NILESH CHAWAN: स्पाय कॅमेराने पत्नी सोबतच्या शरीर संबंधाचे चित्रीकरण;निलेश चव्हाणच्या काळ्या कृत्यांची संपूर्ण हिस्ट्री

544 0

NILESH CHAWAN: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होता दिसत आहेत. या प्रकरणात वैष्णवी यांचे पती, सासू आणि ननंद त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते.. त्यानंतर पोलिसांनी मोठा शिताफीने दोघांना अटक केली.. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं मुल माहेरच्यांकडे सोपवण्यास नकार देतं वैष्णवीच्या घरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. आणि त्याचबरोबर आता या निलेश चव्हाण इतिहासही आता समोर आला.3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या NILESH CHAWAN: पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद गोष्ट अडकवल्यासारखं वाटलं. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिले.पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली.एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पहिला असता त्यामध्ये त्यांच्या शरीरसंबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं.विशेष म्हणजे बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन निलेश पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.निलेशच्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या पत्नीला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले .निलेशच्या पत्नीने याबात जाब विचारला असता त्यानं घरातील चाकू दाखवत तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला. त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले.

TOP NEWS MARATHI | VAISHNAVI HAGAWANE CASE NILESH CHAWAN: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणचा काळा इतिहास

निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई – वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला.त्यानंतर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला .निलेशच्या अटकपूर्व जमीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला.

VAISHNAVI HAGWANE CASE: फरार सासरा आणि दिराला पोलिसांकडून अटक

वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना आता निलेश चव्हाण याच्यावर कस्पटे कुटुंबीयांना धमकी दिल्याप्रकरणी त्याचबरोबर कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखल्याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध होते.. त्याच बरोबर निलेश चव्हाण यांच्या पत्नीने देखील स्पाय कॅमेरा लावून शरीर संबंध असे व्हिडिओ चित्रीकरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात याप्रकरणी 2009 मध्ये निलेश चव्हाण यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याचबरोबर त्याच्यावर हिंजवडीमध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह ची केस आहे.. वैष्णवी हलवणे यांच्या कुटुंबीयांना धमकवण्या प्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासात नेमकं काय पुढे येत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Jayant Narlikar passes away: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचं निधन

Share This News
error: Content is protected !!