NILESH CHAVAN ARREST STORY: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली.
तब्बल दहा दिवस फरार असलेला निलेश चव्हाण हा सापडला एकटाच मात्र फरार होताना त्याच्याबरोबर होती त्याची एक जवळची मैत्रीण..
हीच मैत्रीण ठरली पोलिसांना निलेश पर्यंत पोहोचवणारी महत्त्वाची कडी..
स टाइम कॉलमुळे निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात अडकला
त्यातच निलेशने जवळच्या व्यक्तीला फेस टाइम कॉल केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पाहूया पुणे ते नेपाळ बाय रोड आणि नेपाळ ते पुणे इन पोलीस व्हॅन… या संपूर्ण घटनाक्रमाची फुल स्टोरी NILESH CHAVAN ARREST STORY:
16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली.
नऊ महिन्यांचे बाळ जनक याला हगवणे कुटुंबीयांनी निलेशच्या स्वाधीन केलं.
निलेश बाळ आणि लता व करिष्मा हगवणे यांचे मोबाईल घेऊन घरी आला.
आपण या प्रकरणात अडकणार नाही याचा कॉन्फिडन्स असलेल्या निलेश च नाव २० तारखेला या प्रकरणात चर्चेत आलं.
21 ला लगेचच निलेशने पुणं सोडलं. त्याने घटस्फोट झालेल्या एका मैत्रिणीला सोबत घेतलं.
बक्कळ दिवस पुरेल इतकी कॅश घेतली. आणि फिरायला जायचंय असं सांगून मैत्रिणीला घेऊन कोकणात गेला.
कोकणातून मुंबईला गेला आणि तिथून बाय रोड दिल्लीला गेला.
दिल्लीतून या मैत्रिणीच्या मोबाईल वरून त्याने एका जवळच्या व्यक्तीला फोन केला.
यावरून निलेश आणि ही महिला एकत्र असल्याचं समजलं
. पोलिसांना या दोघांचं लोकेशन मिळालं आणि तपासाचा वेग वाढला.
त्यादरम्यान निलेशने दिल्लीतून गोरखपूरची बस पकडली.
व नेपाळच्या दिशेने निघाला.. तर सोबत असलेल्या मैत्रिणीला त्याने पुन्हा घरी पाठवलं.
मात्र मैत्रिणीच्या मोबाईल वरून केलेल्या कॉल मुळे निलेश अडकला होता.
पोलिसांनी निलेशचा जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू केली होती.
त्यातूनच त्याने सोबत मैत्रिणीची ही चौकशी करण्यात आली.
यावेळी या महिलेला निलेशने केलेलं हे कांड माहीत नव्हतं.
केवळ फिरायला म्हणून ती त्याच्याबरोबर गेली असल्याचं तिने सांगितलं.
मात्र निलेश बाय बस गोरखपूरला गेला की माहिती तिच्याकडूनच मिळाली.
या महिलेचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याने तिला चौकशी करून सोडून देण्यात आलं.
मात्र ज्या बसने निलेश निघाला होता त्याच बसच्या माध्यमातून पुढील तपास सुरू करण्यात आला..