गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस आधिकारी पुजा खेडकर यांच्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे.
पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली आहे. पुजा खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील