suicide

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

365 0

गोंदिया : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे ते आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही लोक परीक्षेत यश न आल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये NEET परीक्षेत (NEET Exam) कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत (Suicide) आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नीट परीक्षेचा निकाल 13 जून रोजी रात्री अकरा वाजता लागला. यावेळी गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सलोनी गौतम (Saloni Gautam) या विद्यार्थिनीने आपला निकाल पाहिल्यावर तिला कमी गुण मिळाळ्याने तिला मोठा धक्का बसला. यानंतर तिने पुढचा मागचा विचार न करता तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरातील सर्व झोपी गेले होते.

या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली असून सलोनीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. उच्च स्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस (Amgaon Police) करीत आहे.

Share This News
error: Content is protected !!