Nashik Video

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

656 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका गुंडाने तलवारीच्या साहाय्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नाशिकच्या इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
इंदिरा नगरमधील साईबाबा मंदिर परिसरात हा प्रकार घडला आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशानं गुंडाकडून हातात तलावर घेऊन झेरॉक्स दुकानावर हल्ला करण्यात आला आहे. अचानक घडलेला हा सर्व प्रकार बघून दुकानात उभी असलेली एक तरुणी बेशुद्ध झाली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओमध्ये पाहू शकता काही ग्राहक या झेरॉक्स दुकानावर उभे आहेत. याचवेळी एक व्यक्ती हातात तलवार घेऊन येतो. तो ती तलवार झेरॉक्ट दुकानाच्या काउंटरवर जोरात आपटतो. या प्रकारानंतर तिथे उभे असलेले ग्राहक तिथून निघून जातात. मात्र हा सर्व प्रकार पाहून दुकानात उभ्या असलेल्या एका तरुणीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. या घटनेमुळे गुंडांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!