नाशिक हादरलं ! दारूच्या नशेत जन्मदात्या पित्यानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

167 0

जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत आजारी मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीत शिकते. 25 एप्रिल 2024 रोजी या मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ती शाळेत गेली नव्हती. तर घरातील इतर सदस्य देखील आपापल्या कामासाठी बाहेर गेले होते. मुलगी एकटीच घरातली झोपलेली होती. त्याचवेळी दारूच्या नशेत असलेला नराधम बाप घरात आला. घरात कुणी नसल्याची संधी साधत मुली जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्याने त्याचा व्हिडिओही मोबाईलवर बनवला. आणि हा व्हिडिओ आईला दाखवण्याची धमकी देत मुलीला कुठेही वाच्यता न करण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्याचाच गैरफायदा बापाने अनेकदा घेतला.

तीन महिन्यानंतर मुलीच्या आईने सहज पतीचा मोबाईल चेक केला असता तिला हा व्हिडिओ आढळून आला. त्यानंतर तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने याबाबत खुलासा केला. त्यानंतर आईने थेट म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी तात्काळ या नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!