NASHIK NEWS:  नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली.. शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात एक बळी निश्चित आहे असं म्हणतं नाशिकमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत तब्बल 50 लाखांना लुबाडलं.. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे...

NASHIK NEWS:तंत्र विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाचे महिलेवर अत्याचार अन् 50 लाखांची फसवणूक

66 0

NASHIK NEWS:  नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली..
शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात एक बळी निश्चित आहे असं

म्हणतं नाशिकमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत

तब्बल 50 लाखांना लुबाडलं.. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे…

NASHIK NEWS:तंत्र विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाचे महिलेवर अत्याचार अन् 50 लाखांची फसवणूक

नाशिक जिल्ह्यातील

पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी मंदिरानजीक असलेल्या भवानी माता परिसरात एका

मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करून जमिनीतून सोने काढण्याचे

आमिष दाखवून अनेक वर्ष एका महिलेच लैंगिक शोषण केलं.

Graduate&Teacher Election: पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ

. आणि तब्बल 50 लाखांची फसवणूक केली.. पीडित महिलेच्या तक्रारीवरून
पीडित महिलेच्या पतीचे दारूचे व्यसन घालवून देतो यानिमित्ताने संशयित भोंदूबाबा गणेश जगताप हा तिच्या संपर्कात आला.

त्यानंतर गणेश हा पीडित महिलेला विविध तांत्रिक पूजाविधींसह स्मशानभूमीत विधी करतो, अशा प्रकारच्या गोष्टी सांगून,

तसेच तू मला आवडतेस, असे सांगत त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.यानंतर एक पुस्तक दाखवत

या पुस्तकात महिलेचा पती व मुलांची नावे असल्याचे सांगत

शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर यातील कोणाचाही बळी जाईल, अशी धमकी दिली. आणि वारंवार या

महिलेवर अत्याचार केले याशिवाय बंगला घेऊन देतो, फ्लॅट मिळवून देतो

PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

, जमिनीतून सोने काढून देतो, पैशांचा पाऊस पाडून देतो, अशी खोटी आश्वासन देत या महिलेची तब्बल पन्नास लाखांची फसवणूक केली..

यापूर्वीही गणेश जगताप या भोंदू बाबाने पाथर्डी गावाजवळ भवानी माथा परिसरात मंदिरात येणाऱ्या भाविकांची फसवणूक केली होती

या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितावर बलात्कार, फसवणूक तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

इंदिरानगर पोलीस संशयीत भोंदूबाबा गणेश जगताप याचा शोध घेत आहेत.

KOLHAPUR CITY LEOPARD VIDEO: कोल्हापुरातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याची FULL STORY

या प्रकरणात फरार असलेल्या भोंदू बाबा गणेश जगताप याला नाशिक पोलीस कधी ताब्यात घेतात आणि

या गंभीर गुन्ह्याचा छडा लावतात, त्याचबरोबर या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे.

हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

NAVALE BRIDGE l MURLIDHAR MOHOL : नवलेपुल अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्याकरिता उपाययोजना करा

Share This News
error: Content is protected !!