नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडच्या वडाळीभोईजवळील उड्डाण पुलावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. या आगीमध्ये पूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेतून ट्रक चालक आणि क्लीनर थोडक्यात बचावले आहेत. हा ट्रक सिमेंट घेऊन जात होता. यादरम्यान या ट्रकला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडच्या वडाळीभोई उड्डाणं पुलावर ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर टोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यत ट्रक जळून खाक झाला होता.चालक आणि क्लीनर वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या घटनेमुळे महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे या ट्रकला आग लागली असल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. सध्या या दुर्घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून तुम्हाला घटनेचे गांभीर्य लक्षात येईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या