Nashik Accident News

Nashik Accident News : निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने अचानक घेतला पेट

613 0

नाशिक : राज्यात अपघाताचे (Nashik Accident News) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. नाशिकमध्ये अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये एका धावत्या शिवाशाही बसने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. या बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा येथे धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याची कळताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Satara News : मजूरांना डबे देऊन येताना अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide