नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव गाडी पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाढदिवस साजरा करुन परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.
कसा घडला अपघात?
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हा अपघात घडला. भोकर – उमरी मार्गावरील मोघाळी पुलावरून चारचाकी ब्रिझा गाडी कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. मृत आणि जखमी सर्व जण भोकर तालुक्यातील रेणापूर येथील रहिवाशी आहेत. भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहतात. भोकर येथे नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने सगळेजण भोकर येथे आले होते. कार्यक्रम आटोपून परत तेलंगणाला जाताना माघोळी पुलावरून त्यांची गाडी कोसळली. तिघांचा जागेवर तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतामध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. सहा जखमींवर उपचार सुरु आहेत.
या अपघातात सविता शाम भालेराव (25), रेखा परमेश्वर भालेराव (30), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (30) प्रिती परमेश्वर भालेराव (8) आणि सुशील मारोती गायकवाड (7) अशी मृतांची नावे आहेत. तर दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (8), प्रितेश परमेश्वर भालेराव (8), शोहम परमेश्वर भालेराव (7), श्याम तुकाराम भालेराव (35), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (28), परमेश्वर तुकाराम भालेराव (28), श्रीकांत अरगुलवार अशी जखमींची नावे आहेत. जखमींना नांदेडला उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. तर काही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात