Nana Patole

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

564 0

भंडारा : भंडाऱ्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातातून नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील भीलवाडा गावाजवळ हा अपघात झाला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटोपून सुकळी या गावी जात असताना नाना पटोलेच्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत.

काय घडले नेमके?
नान पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षित आहेत.

या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांकडून या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide