NAGPUR SAMIRA FATIMA CASE: नागपूरच्या ‘क्रिमिनल दुल्हन’चा पर्दाफाश! 15 वर्षात 8 पती आणि कोट्यवधींची लूट!”

57 0

NAGPUR SAMIRA FATIMA CASE: नागपूरमधून एक हादरवणार प्रकरण आता समोर आलंय.. एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल आठ लग्न केले.. आणि नवऱ्याची फसवणूक केली.. नवव्या नवऱ्याच्या शोधात असताना (NAGPUR SAMIRA FATIMA CASE) पोलिसांनी तिला अटक केली आणि त्यानंतर समोर आलं हादरवून टाकणार सत्य… पाहुयात

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न

समीरा फातिमा असं या फसवणूक करणाऱ्या महिलेच नावं.. ही महिला उच्च शिक्षित असून तिने शाळेत शिक्षिका म्हणून कामही केलं..समिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. स्वतःला घटस्फोटित असल्याचे सांगून सहानुभूती मिळवायची , ‘मला आधार द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहीन.’ या बहाण्याने ती पुरुषांशी लग्न करायची, सुहागरात साजरी करायची आणि मग त्यांच्याशी भांडण करून त्याचं हृदय तोडायची. ही महिला एका महिन्याच्या आत भांडण करून ब्लॅकमेलिंग सुरू करायची. अशा पद्धतीचा प्रकार तिने एक, दोन नव्हे तर आठ विवाहित पुरुषांसोबत केला..गेल्या 15 वर्षांपासून ती अशा पद्धतीने फसवणूक करायची. ती अशा पद्धतीने एकटी कट रचायची नाही. तर ती एका संघटित टोळीच्या साथीने ती हा कट रचायची.. फातिमाने एका पीडित नवऱ्याकडून 50 लाख रुपये आणि दुसऱ्याकडून 15 लाख रुपये लुटले. प्रत्येक व्यक्ती बरोबर लग्न करून लग्नानंतर पतींना वेगवेगळ्या बहाण्यांनी ब्लॅकमेल करून वसूल करायची. जेव्हा जेव्हा पोलिस तिच्या अटकेपर्यंत पोहोचायचे, तेव्हा ती खोट्या गरोदरपणाचा दावा करून पळून जायची.मात्र यावेळी पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी 29 जुलै रोजी नागपुरातील एका चहाच्या टपरीवरून तिला अटक केली.

TOP NEWS MARATHI :’दादा माधुरी हत्ती परत आणा’,वरवंडच्या सभेत तरुणाची अजित पवारांकडे विनंती

“समिरा फातिमा… एक शिक्षिका… पण तिचं शिक्षण कुणाचं आयुष्य घडवण्याचं नव्हतं, तर मोडण्याचं होतं.
प्रेमाचा खोटा मुखवटा चढवून… सहानुभूतीचं नाटक करून… लग्नासारख्या पवित्र नात्याला तिने फसवणुकीचं साधन’ बनवलं.””एका, दोन नवऱ्यांपुरतं हे प्रकरण मर्यादित असतं, तर कदाचित हा एक अपवाद समजून दुर्लक्ष झालं असतं…
पण 8 नवरे करून पंधरा वर्षांपासून पद्धतशीरपणे फसवणूक करून लाखोंची लूट केली आणि भावनांची विटंबना केली.. अशा पद्धतीने फसवणूक करणं तिच्यासाठी एक ‘बिझनेस मॉडेल’ होतं!””ज्या महिलेने शाळेत मुलांचं भविष्य घडवायला हवी होती, ती पुरुषांच्या आयुष्याचा विनाश करत होती.”पोलिसांच्या हाती लागलेली ही ‘दुल्हन क्रिमिनल’ सध्या कोठडीत आहे… आता या पोलीस तपासात कोणती धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

Share This News
error: Content is protected !!