Nagpur News

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

660 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या अल्पवयीन बहिणीने घरातून पळ काढल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणाने मित्राच्या रूममध्ये जाऊन चाकूने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावला. त्या झटापटीत त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या तरुणाच्या गळ्यावर चाकूचे घाव बसल्याने तो जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बिरगाव येथील पर्ल्स हेरिटेज बिल्डिंगमध्ये घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुभम प्रमोद करवडे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव असून तो इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. मृतक शुभम हा अमरावतीचा रहिवासी आहे.बिरगाव परिसरामधील कान्हा सेलिब्रेशनच्या मागे असलेल्या पर्ल्स हेरिटेज बिल्डिंगमध्ये गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. त्याच खोलीत त्याचा भाऊ मनीष करवडे देखील राहतो, तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. आरोपी रोहित हा त्याचा मित्र आहे. रोहितची 17 वर्षीय बहीण 22 जानेवारी रोजी अचानक बेपत्ता झाली, याबाबत त्यानी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र, पोलिसात तक्रार करुनही त्याची बहिणीचा शोध लागू शकला नाही, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता.

गुरुवारी रात्री रोहित हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी पर्ल्स हेरिटेज बिल्डिंगच्या मध्ये गेला होता. तिथे त्याने भाजी कापण्याचा चाकू गळ्यावर ठेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिथे शुभम आणि त्याचा भाऊ मनीष तिथे उपस्थित असल्याने त्यांनी रोहितला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या झटाझपटित शुभम करवडे याच्या गल्यावर चाकू लागून तो गंभीर जखमी झाला. रात्री शेजारी राहणाऱ्या ऑटोचालकाच्या मदतीने दोघांनी जखमी शुभमला वैद्यकीय रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहितविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Accident Video : चालकाची एक चूक अन् 7 जण ठार; थरकाप उडवणारा अपघात आला समोर

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!