Nagpur News

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

496 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये काल रात्रीच्या सुमारास नागपुरातील मानकापूर कल्पना टॉकीज चौकात एका बेदरकार ट्रकनं दहा पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 12 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान ट्रकनं धडक दिलेल्या वाहनांमध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश असून, त्या रुग्णवाहिकेचा या अपघातात चेंदामेंदा झाला आहे.

काय घडले नेमके?
एमएच 34 एबी 7881 क्रमांकाच्या ट्रकचालकाचं मानकापूर उड्डाणपुलावरून उतरताना ट्रक वर असणारं नियंत्रण सुटलं आणि समोर सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना हा ट्रक जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, काही कार फरफटत पुढे गेल्या… तर काही कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघातानंतर काही काळासाठी कोराडी मार्गावरील वाहतुकही पूर्णपणे विस्कळीत झाली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत ही वाहतूक सुरळीत केली. या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!