Viral Video

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

482 0

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी (Viral Video) समोर आली आहे. यामध्ये माजी नगरसेवकावर हल्ला करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला. अज्ञात आरोपीकडून हा हल्ला करण्यात आला असून ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. दिलीप बांडेबूचे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
दिलीप बांडेबूचे हे रात्री घरी जात होते. त्यावेळी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या एका अज्ञाताने ते एकटे आहेत हे पाहून संधी साधली आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना जखमी केलं. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्यांना सोडून अज्ञात आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे.

हल्ल्यात माजी नगरसेवक जखमी झाले असून कामठी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अज्ञात आरोपीने हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला करुन पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News
error: Content is protected !!