Murder Accused Public Parade Nashik: नाशिकरोड परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मिरवणुकीने शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे. आरोपी जेलमधून (Murder Accused Public Parade Nashik) सुटल्यावर त्याच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढून सोशल मीडियावर रिल्स पोस्ट केल्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची गंभीर दखल घेत नाशिकरोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
Pune Rain Update: पुणे शहराला पावसाचा दिलासा; पण जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाचा इशारा
घटना 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. खुनाच्या गुन्ह्यात अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ (Murder Accused Public Parade Nashik) चिमण्या हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर त्याचे समर्थक प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी यांच्यासह १५ ते २० जणांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रं मिरवत रस्त्यावर मिरवणूक काढली. या मिरवणुकीत दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत, रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्या अंगावर वाहनं घालण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं. नाशिकरोड (Murder Accused Public Parade Nashik) पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिटको पॉईंटपर्यंत पोलिसांनी आरोपींची धिंड काढून गुन्हेगारीविरोधात संदेश दिला की, पोलिसांचा वचक अजूनही कायम आहे आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना माफ केले जाणार नाही.
HINGOLI MLA SANTOSH BANGAR & MP NAGESH PATIL ASHTIKAR दोन्ही सेनेचे आमदार, खासदार जनता दरबारात
या प्रकरणी अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय टेमगर करत आहेत. पोलिसांची ही तात्काळ कारवाई सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.