Poster Viral

Poster Viral : औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे; ‘त्या’ पोस्टरवरून वातावरण पेटण्याची शक्यता?

697 0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह औरंगजेबाचा फोटो असलेले पोस्टर (Poster Viral) लावल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या केसरी टूर्स ऑफिसच्या समोर मध्यरात्रीच्या सुमारास हे पोस्टर (Poster Viral) लावण्यात आले. हे पोस्टर नेमके कोणी लावले अद्याप आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे पोस्टर हटवले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सुरक्षेत कपात?

काय आहे पोस्टरमध्ये ?
माहिममध्ये उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर-औरंगजेब यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे” असा एकेरी भाषेतील मजकूर लिहिण्यात आला आहे. ‘शिवरायांची जनता’ असं खाली लिहिण्यात आलं आहे. तर #UddhavThackerayForAurangzeb अर्थात औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॅशटॅग बॅनरवर खाली छापण्यात आला आहे. या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला

मुंबईतील माहिम भागातील केसरी टूर्स ऑफिससमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हे बॅनर (Poster Viral) काढून टाकले आहेत. नेमके कोणी हे पोस्टर लावले याचा शोध सुरु आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!