Mumbai-Pune Express

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

581 0

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात?
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढे असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमीनी कारला धडक दिली. ट्रकनं दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, ओमनीमधील 3 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!