MUMBAI KANDIWALI CYBER NEWS: मुंबई पोलिसांकडून सायबर रॅकेटचा पर्दाफाश;देशभरात केली 60 कोटींची फसवणूक

94 0

MUMBAI KANDIWALI CYBER NEWS:  मुंबईत सायबर क्राईम ब्रांचने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचं जाळं उध्वस्त केलं आहे.

कांदिवलीतून बोगस कंपन्यांच्या माध्यमातून चालवलं जाणारं रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलं पाहुयात.

MUMBAI KANDIWALI CYBER NEWS:मुंबई पोलिसांकडून कांदिवलीमधील सायबर रॅकेटचा पर्दाफाश

कांदिवली पूर्व येथील बोगस कंपन्यांमधून हे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली…

त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. डी. जी. सर्च कन्सलटन्सी व प्रिरीत लॉजिस्टीक प्रा. लि. या नावाखाली बँक पासबुक, चेकबुक, ई-मेल अकाऊंट, सिमकार्ड ॲक्टीवेट करून पुढे फसवणुकीसाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले.

छाप्यात आरोपींकडून २५ मोबाईल, ४६ एटीएम कार्ड, ३० चेकबुक, १०४ सिमकार्ड, लॅपटॉप व प्रिंटर जप्त करण्यात आले. आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे रॅकेट देशभर पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॅपटॉपच्या तपासणीत तब्बल ९४३ बँक खाते वापरल्याचे व त्यापैकी १८१ खाते सायबर फसवणुकीसाठी असल्याचे निष्पन्न झाले.

सायबर नियंत्रण कक्ष हेल्पलाईन १९३० वर या खात्यांशी संबंधित ३३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईतील १६ प्रकरणांपैकी १४ गुन्हे नोंदवले गेले असून महाराष्ट्र व इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल आहेत.

या टोळीने केवळ मुंबईत १.६७ कोटी, महाराष्ट्रात १०.५७ कोटी तर देशभरातून तब्बल ६० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!