मुंबई : मुंबईतील मंत्रालयामधून एक धक्कादायक घटना (Mumbai News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. अरविंद बंगेरा असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
हाती आलेल्या माहितीनुसार, सदरील व्यक्ती बोरिवली येथील रहिवासी आहे. काही कामानिमित्त ते मंत्रालयात आले होते. मात्र अचानक या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.यानंतर ती व्यक्ती पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यांना ताब्यात घेतले.
त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. अरविंद बंगेरा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांची वडापावची गाडी आहे. बंगेरा यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM कडून छत्रपती संभाजीनगरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक
Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले
Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ
Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू
Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात