MUMBAI KONARK EXPRESS INCIDENT: रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. भुवनेश्वर-मुंबई कोणार्क (MUMBAI KONARK EXPRESS INCIDENT) एक्सप्रेसमध्ये घडलेल्या किरकोळ वादातून थेट एका पुण्यातील तरुणाचा बळी गेला आहे. अकोल्यातील प्रवाशाने एका २० वर्षीय तरुणाला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिल्याची ही थरारक घटना आहे.
Kolhapur Car Accident Miracle Survival: 400 फूट खोल दरीत गाडी कोसळली; चमत्कारिकरीत्या वाचले दांपत्य!
ही घटना सोमवारी मध्यरात्री, सुमारे दोनच्या सुमारास, कर्जत आणि भिवपुरी रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. पुण्याचा विनोद कांबळे (वय २०) आपल्या मित्रासोबत (MUMBAI KONARK EXPRESS INCIDENT) मुंबईतील हाजी अली दर्ग्याला दर्शनासाठी निघाला होता. दोघे कोणार्क एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान डब्याच्या दरवाज्याजवळ बसण्याच्या कारणावरून अकोल्यातील प्रवासी मंगेश सूर्याशी त्याचा वाद झाला.
LATUR AUSA NEWS : बहिण-भावाचा जागीच मृत्यू; वाघोली गावात शोककळा
प्रथम हा वाद शाब्दिक स्वरूपात होता, मात्र काही क्षणांतच मंगेशने रागाच्या भरात विनोदला लाथ मारली. त्यामुळे विनोद तोल जाऊन थेट धावत्या ट्रेनमधून खाली पडला. (MUMBAI KONARK EXPRESS INCIDENT) गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपासादरम्यान आरोपी मंगेश सूर्याला ठाणे रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हत्याकांडानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. किरकोळ वादातून थेट जीव घेण्यापर्यंत गेलेल्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सार्वजनिक प्रवासात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलिसांनी अशा घटनांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.