मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे (Mumbai Firing) मुंबई हादरली आहे. मुंबईतील चुनाभट्टीच्या आझाद गल्लीत आज दुपारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीनजण जखमी झाले असून या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपींनी भरदिवसा गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी 10 हून अधिक राऊंड झाडण्यात आले. जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे समजत आहे. या गोळीबारात सुमित येरुणकर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी 9 पथके तयार करण्यात आली आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी