Mumbai Fire News

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

478 0

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीमध्ये एक धक्कादायक घटना (Mumbai Fire News) घडली आहे. यामध्ये गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही आगीची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 15 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

यावेळी अग्निशमन दलाने नऊ जणांना रेस्क्यू केले आहे. मात्र या घटनेत हिरेन शाह (60) आणि नलिनी शाह (82) या दोघांचा मृत्यू झाला आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!