CHANDAN NAGAR POLICE: भाजी मंडईत आई आणि मुलाकडून तरुणाच्या डोक्यात फरशीने घाव घालून हत्या

MUMBAI DOCTOR CYBER NEWS: मुंबईतील डॉक्टर ठरले सायबर गुन्हेगारीचे बळी,प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखोंची फसवणूक

60 0

MUMBAI DOCTOR CYBER NEWS: मुंबईतील एक पस्तीस वर्षीय डॉक्टर सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत…

सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून त्याच्याशी संपर्क साधला

आणि नंतर त्याचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून

मोठी रक्कम वसूल करण्यात आली…

पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे?

SHARAD MOHOL याच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला PUNE CRIME BRANCH कडून अटक
फेब्रुवारी महिन्यात पीडित डॉक्टरची सोशल मीडियावर ‘सोम्या अवस्थी’ नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली.

स्वतःला चंदीगडची एमबीबीएस विद्यार्थिनी आणि दिल्लीची रहिवासी असल्याचं सांगत त्या महिलेने डॉक्टरशी संवाद वाढवला.

काही दिवसांतच दोघांमधील चॅटिंग वाढलं… आणि नातं जवळीकचं झालं….हळूहळू महिलेने पीडित डॉक्टरकडे महागड्या भेटवस्तूंची मागणी सुरू केली.

डॉक्टरने विश्वासाने तिच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू लागले.

 

पण या पैशांचा नेमका वापर कुठे झाला याचं कोणतंही बिल किंवा पुरावा महिलेने दाखवला नाही.यानंतर नातं आणखी पुढे सरकलं… ‘सेक्स चॅट’ सुरू झालं. महिलेने स्वतःचे न्यूड फोटो पाठवले आणि डॉक्टरलाही प्रायव्हेट फोटो पाठवण्यास भाग पाडलं.

त्यानंतर महिलेने मुंबईला येण्याचं सांगून डॉक्टरकडून बिझनेस क्लासचं तिकीट बुक करवून घेतलं.

मात्र अशी कोणतीही फ्लाइटच नसल्याचं समोर आलं…2 मे रोजी अचानक महिलेने व्हॉट्सअॅपवर ‘वन टाइम व्ह्यू’ फोटो पाठवला.

त्यात थायलंडमधील एका हॅकरने तिचे फोटो आणि चॅट हॅक करून 3.10 बिटकॉइन म्हणजे तब्बल 2.5 कोटी रुपये मागितल्याचं सांगितलं.

पैसे न दिल्यास खाजगी चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली….

या धमकीने घाबरून डॉक्टरने बँकांकडून कर्ज घेतलं आणि 94 लाख रुपये महिलेला ट्रान्सफर केले…

मात्र पैसे पाठवताना त्याला खात्याचं नाव ‘जसलीन कौर’ असल्याचं दिसलं… इथेच त्याला संशय यायला सुरुवात झाली.

“यानंतर डॉक्टरने स्वतः तपास सुरू केला… महिलेचं सोशल मीडिया प्रोफाइल, कॉलेज डिटेल्स पडताळून पाहिल्यावर मोठा धक्का बसला…

कारण ‘सोम्या अवस्थी’ नावाची महिला एमबीबीएस नव्हे तर आर्ट्सची विद्यार्थिनी असल्याचं उघड झालं…

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरने सायबर पोलिसांकडे धाव घेतली…

सध्या अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे…

पोलिसांच्या हाती काही तांत्रिक पुरावे लागले असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.

PRADHANMANTRI VIKASIT BHARAT ROJGAR YOJANA:प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना नेमकी काय?
प्रेमाच्या नावाखाली रचलेलं हे सायबर जाळं… आणि त्यात अडकलेला एक सुशिक्षित, यशस्वी डॉक्टर…

डॉक्टर सायबर गुन्हेगारीचे बळी ठरल्याने त्यांना तब्बल 94 लाख रुपये एका क्षणात गमवावे लागले.

आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असला तरीही

त्याच सोशल मीडियावरून अशाप्रकारे वारंवार फसवणुकीच्या घटना घडत आहेत..

आपण कितीही उच्चशिक्षित असलो, कितीही जागरूक असलो

तरी पण भावनिक नात्यातील एक चुकीचा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

Share This News
error: Content is protected !!