पुण्यातील ‘या’ कुख्यात गुंडानं घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

571 0

पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांची भेट घेतली असल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

कोण आहे हेमंत दाभेकर?

हेमंत दाभेकर हा कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा अंत्यत जवळचा मानला जातो. शरद मोहोळचा राईट हॅन्ड अशी त्याची ओळख आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणात शरद मोहोळ सोबतच हेमंत दाभेकर हा देखील आरोपी होता, त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Share This News
error: Content is protected !!